अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा परिसरात दरोडा टाकून फरार झालेल्या लायसन टसाळू भोसले (रा. पांढरेवाडी, कोळगाव) याला बेलवंडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील नगर दौंड रस्त्यावरील विसापूर फाटा परिसरात 17 सप्टेंबर 2019 रोजी पडलेल्या दरोड्यातील आरोपी लायसन टसाळू भोसले हा दरोडा टाकून फरार झाला होता.
बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना फरार आरोपी लायसन टसाळू भोसले हा पांढरेवाडी येथे आल्याची गुप्त माहिती मिळाली. दरम्यान पीआय शिंदे यांनी पोलीस पथकाला सूचना दिल्या.
व आरोपीला ताब्यात घेण्यास सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार पांढरेवाडी येथे जाऊन पाहणी केली असता घटनेतील फरार आरोपी लायसन टसाळू भोसले हा तेथे मिळून येताच त्याला बेलवंडी पोलिसांनी अटक केली.