अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करतात.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे जो, सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका भीक मागून पोटभरणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांचा आहे.
एका भिक मागणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जी गर्दी झाली आहे. ती पाहून लोकं विचारात पडले आहेत. बसवा उर्फ हुच्चा बस्या भीक मागून आपला गुजारा करायचे.
त्यांचा गेल्या आठवड्यात शुक्रवारी अपघात झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांनी उपचारांना प्रतिसात न देता शनिवारी आपले प्राण सोडले.
मात्र, त्यांच्या अंत्ययात्रेसाठी त्यांच्याशी अनोखं नातं जोडलं गेलेल्या लोकांनी मोठी गर्दी केली होती. या व्हिडीओमध्ये इतकी जास्त गर्दी पाहून तुम्हाला वाटेल की, एखाद्या सेलेब्रिटी किंवा मोठ्या व्यक्तीची अंत्ययात्रा असावी,
परंतु तसे नाही. हुच्चा बस्या आयुष्यभर भीक मागून दिवस काढत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोकांची गर्दी झाली.