अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचा सल्ला देणार्या आरोग्य विभागातील आरोग्यसेवकांच्या परीक्षेत चक्क एकाच बेंचवर दोन विद्यार्थी बसविण्यात आले. त्यामुळे सामूहिक कॉपीसारखे प्रकार घडले.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. आरोग्य विभागातील आरोग्य सेवक या पदासाठी दि. 28 फेब्रुवारी रोजी सर्वत्र परीक्षा घेण्यात आली.
राहुरी तालुक्यातील एका शाळेत परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी एकाच बेंचवर दोन विद्यार्थी पेपर देण्यासाठी बसविण्यात आले. काही पेपरहॉलमध्ये बेंचवर नंबर टाकलेले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. शाळा प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे सामूहिक कॉफीसारखा प्रकार या शाळेत घडला आहे.
त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शाळा प्रशासनाच्या या गलथान कारभाराची दखल कोण घेणार? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.
यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य जिल्हा अधिकारी यांनी दखल घ्यावी आणि घडलेल्या प्रकाराची चौकशी करून शाळा प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी, असे विद्यार्थी व पालकांतून बोलले जात आहे.