विचाराने काम होणाऱ्या गावाचे भविष्य उज्वल : पद्मश्री पवार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  ज्याकामासाठी मी गेली पंचवीस वर्षे आदबत आहे ते काम सामाजिक कार्यातून तसेच श्रमदानातून केल्याने पूर्ण झाले.

ज्या गावात विचाराने काम होते त्याच गावाचे भविष्य उज्वल असल्याचे प्रतिपादन आदर्श गाव योजना प्रकल्प आणि संकल्प समिती कार्यध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. ते श्रीगोंदा येथे वृक्ष लागवड प्रसंगी बोलत होते.

पूर्वी मोठी जंगल होते मात्र आपण आपल्या फायद्यासाठी वृक्षतोड केल्याने निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना सारख्या संकटाना सामोरे जावे लागले आहे.

त्यामुळे आपल्याला वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. लावलेली झाडी वाढली तर पाऊस पडून परिसरातील तळे, ओढे, नाले भरतील आणि परिसर सुजलाम सुफलाम होईल असे नागवडेचे चेअरमन राजेंद्र नागवडे म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24