अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नगर दौंड रस्त्यावरील इंदिरानगर भागातील एका घरातच जुगार अड्डा सुरु होता. या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून सात जुगाऱ्यांविरूध्द कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर दौंड रस्त्यावरील इंदिरानगर भागात एका घरातच विनापरवाना तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांना मिळाली.
त्यांच्या सूचनेवरून पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे यांनी पोलिस पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी सात जुगाऱ्यांवर कारवाई करीत
२ हजार ३८० रूपये व जगाराचे साहित्य असा मद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोकॉ अभय कदम यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.