कारचे शोरूम लुटणाऱ्या टोळीला सिन्नर मधून केली अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  संगमनेर मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी कारचे शोरूम लुटल्याची घटना घडली होती. या घटनेत चोरटयांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता.

दरम्यान पोलिसांनी या पसार झालेल्या टोळीला सिन्नर पोलिसांच्या मदतीने संगमनेरशहर पोलिसांनी जेरबंद केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या काही दिवसांपूर्वी संगमनेर शहरालगत असणार्‍या कारच्या शान शोरुममध्ये रात्रीच्या सुमारास शिरुन अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 20 हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांना या चोरट्यांचा सुगावा लागला. चोरटे हे सिन्नर तालुक्यातील शिंवडे येथील असल्याचे त्यांना समजले.

त्यानुसार सिन्नर पोलिसांच्या मदतीने विजय सुदाम कातोरे (वय 20), सोमनाथ निवृत्ती मेंगाळ (वय 21), विजय सखाराम गिर्हे (वय 20) यांना संगमनेर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल विचारपुस केली असता त्यांनी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली.

चोरट्यांच्या टोळीने अनेक ठिकाणी हातसाफ केला संगमनेर येथील शान कार शोरुममध्ये 1,80,500/- रु. किंमतीचा मुद्देमाल लंपास झाला होता.

अकोले हद्दीतील मोबाईल शॉपी फोडून 2 लाख 54 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचीही या चोरट्यांनी कबुली दिली. येथे चोरट्यांनी चोरलेले 7 मोबाईल, एक बजाज कंपनीची 220 सी.सी.ची मोटार सायकल हस्तगत केली आहे.

सदर चोरट्यांनी होन्डाई शोरुममध्ये देखील कॅश कांऊटरचे लॉक उचकाटुन त्यामधील रोख रnक्कम चोरुन नेल्याची कबुली दिली.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24