अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2022 :- शेअर बाजारात गेल्या काही दिवसात मोठी घसरण सुरु आहे. मात्र या पडझडीतही गुंतवणूकदार खरेदीची संधी शोधत असतात. त्यामुळे गुतंवणूक अशाच शेअर्सच्या शोधात असतात.
हिकाल लिमिटेड ही B2B कंपनी आहे जी ग्लोबल फार्मा कंपन्या, अॅनिमल हेल्थ कंपन्या, क्रॉप प्रोटेक्शन कंपन्या आणि स्पेशालिटी केमिकल कंपन्यांना इंटरमिडीएट आणि अॅक्टिव्ह इंग्रिडेंट्स पुरवठा करते.
गेल्या 5 वर्षात हिकालच्या शेअर्समध्ये अडीच पट वाढ झाली आहे. मार्च 2017 मध्ये 137 रुपये असलेला हे शेअर 364 रुपयांपर्यंत जाऊन पोहचला आहे.
मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हा शेअर 11 टक्क्यांनी घसरला आहे, तर 2022 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत 31 टक्क्यांनी घसरला आहे.
दरम्यान ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने क्रॉप सिक्युरिटीसाठी CDMO कडून मागणी वाढल्याने, फार्मा कंपन्यांकडून अपेक्षित गुणोत्तर वाढल्याने आणि भांडवली खर्चातील सुधारणा
यामुळे हिकाल शेअर्सना ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेजने या मल्टीबॅगर स्टॉकला 12 महिन्यांच्या कालावधीसाठी 500 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे.