दर्शन रांगेतील भाविकाची सोन्याची चेन लांबवली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक दर्शन रांगेत थांबलेले असताना एका भामट्याने त्या भाविकाच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील मढी येथे घडली.

याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यात मढी येथे कानिफनाथांचे दर्शन घेण्यासाठी सध्या भाविकांचे गर्दी होत असून,या गर्दीचा फायदा घेत अनेक भामटे आपला हात साफ करत आहेत.शुक्रवार दि.११ रोजी नेवासा तालुक्यातील शंकर नानासाहेब पवार हे देवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते.

ते दर्शन रांगेत थांबलेले असताना अज्ञात भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली. याबाबत पवार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24