ताज्या बातम्या

आईच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने पळविले; मुलाने पाठलाग करून…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवसेंदिवस चोऱ्या, लूटमार, दरोडा आदी घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे.

नुकतेच कर्जत तालुक्यातील राशीन येथे जगदंबा देवीचा पालखी उत्सव सुरू असतानाच एक अनुचित प्रकार घडला. एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळविल्याची घटना भिगवण रोड येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी एक चार चाकी गाडी ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राशीन येथे पालखी उत्सव सुरू असताना

चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने ओढले. महिलेने आरडाओरड केल्याने त्यांच्या मुलाने चोरट्याचा पाठलाग सुरू केला.

मात्र चोरटा पळत जाऊन स्विफ्ट गाडीमध्ये जावून बसला. चालकाने जोरात गाडी चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी अडवल्याने चोरट्यांनी गाडी तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली.

घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार ताब्यात घेत याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office