माल पिकवला पण आता विकायचा कुठं; बळीराजा झाला हतबल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने अनेक कठोर निर्णय लागू केले आहे. यामुळे सर्वसामान्यांसह अनेकांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.

यातच वर्षभर अनेक संकटांचा सामना करत माळ पिकविलेल्या बळीराजासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. वर्षभर माल पिकवला पण आता तो विकायचा कसा? कारण शासनाने आठवडी बाजार बंद केले आहे.

यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे शासनाचे नियम शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचणी निर्माण करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासून मनुष्य जातीवर कोरोनाचे संकट सुरूच आहे.

मध्यंतरीच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. मात्र, आता गत महिन्यापासून पुन्हा संसर्ग वाढू लागला आहे. कोरोनाने ग्रामीण भागाला विळखा घातला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत.

यामुळेच सर्वच व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामीण भागातील, छोटे-मोठे व्यावसायिक, शेतकरी, भाजीपाला उत्पादक हे आठवडे बाजारात भाजीपाल्याची तसेच अन्य साहित्याची खरेदी-विक्री करीत असतात.

मात्र, आठवडी बाजार बंद पडल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. ग्रामीण भागातील असंघटित क्षेत्रातील कामगार शहरात येऊन अथवा बांधकामावर मजुरी करतात.

त्यावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह असतो. मात्र, आता हाताला काम नसल्याने मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांसह मजूरही संकटात सापडले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24