अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- गर्दीची सर्व ठिकाणे सुरू केली आहेत. लोकलने दररोज सुमारे 50 लाख लोक प्रवास करत आहेत. अशा ठिकाणी सरकार परवानगी देते, मात्र मंदिरे बंद ठेवली जातात.
देव मंदिरात कोंडण्याचे महापाप आघाडी सरकारने केले असून या सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडून आगामी शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत एक हाती निकाल घेऊन नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविणार असल्याची ग्वाही आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय.
भाजपा कार्यकर्त्यांचा आगामी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयी संकल्प मेळावा शिर्डी येथे संपन्न झाला. याप्रसंगी आ. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, शिर्डीचे अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे.
मंदिर बंद असल्याने अनेकांचा रोजगार गेला. महाराष्ट्रात धार्मिक स्थळे बंद असतांना इतर राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे सुरू आहे. तिरुपतीचे बालाजी मंदिर भाविकांसाठी सुरू आहे.
बालाजीला दर्शनासाठी जाणार्या भाविकांना करोना होत नाही, मात्र शिर्डीला येणार्यांना भाविकांना त्रास होतो की काय? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. शिर्डीतील नोंदणीकृत दुकानदार व्यावसायिक,
हातगाडीवाले या सर्वांचा व्यावसायिक कर शासनाने माफ करावा व त्याबदल्यात नगरपंचायत नगरपालिकांना शासनाने अनुदान द्यावे. कर्जाचे हप्ते पाडून मिळावे यासाठी आपण केंद्र सरकारला विनंती करणार आहोत.