Parliament : सरकारने घेतला मोठा निर्णय! घातली ‘त्या’ सोशल मीडिया अकाउंट आणि यूट्यूब चॅनेलवर बंदी

Parliament : सध्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. तरुणाई यामध्ये अडकले असल्याचेही म्हणायला काहीच हरकत नाही. अशातच दिवसेंदिवस या प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती पसरवली जात होती.

त्यामुळे अशा अकाऊंट्सवर सरकारने कारवाई केली आहे. यामध्ये 150 पेक्षा जास्त सोशल मीडिया अकाउंट आणि यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 12 वर्षात एकूण 30 हजारांपेक्षा जास्त वेबसाइट आणि URL बंद केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिले आहे. बोलताना ते म्हणाले की, ‘ब्लॉक केलेल्या या चॅनेलमध्ये एकूण 104 यूट्यूब चॅनेल आणि 5 टीव्ही चॅनेलचा समावेश आहे.’

तसेच 45 व्हिडिओ, 4 फेसबुक अकाउंट, 3 इंस्टाग्राम अकाउंट, 5 ट्विटर अकाउंट आणि 6 वेबसाइट्स ब्लॉक केलेल्या आहेत. जर भविष्यात अशी गरज भासली तर सरकार अशी कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ही कारवाई माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 69A अंतर्गत केली आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेमध्ये भारताच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्याच्या आरोपांमुळे सरकारने असे पाऊल उचलले आहे. तसेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने या चॅनेल्सना खोट्या बातम्या पसरवण्यासाठी जबाबदार असल्याची माहिती दिली आहे.

IT मंत्रालयाने 2021 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 1,643 यूजर जेनरेटेड यूआरएल (URLs) ब्लॉक करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत, ज्यामध्ये वेबसाइट, पोस्ट, वेबपेज आणि सोशल मीडिया अकाऊंटचा समावेश आहे.

2009 पासून बंद केल्या तब्ब्ल 30 हजारांपेक्षा जास्त वेबसाइट आणि URL

नुकतेच अनुराग सिंह ठाकूर यांनी एका लेखी उत्तरात संसदेत अशी माहिती दिली की सरकारने 2009 पासून सोशल मीडिया खात्यांसह तब्बल 30,417 वेबसाइट्स, यूआरएस, वेबपेज आणि सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक केल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत ही कारवाई केली आहे.