शासकीय वसतिगृह कोविड सेंटरसाठी ताब्यात घेऊ नये

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  श्रीगोंदा तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह या दोन संस्था मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत.

मागील लॉकडाऊनमध्ये मुलींच्या शासकीय वसतिगृहाची इमारत तहसिल कार्यालयाकडून अधिग्रहित करून तेथे कोविड सेंटर तयार करण्यात आले होते.

त्यानंतर कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने सदरील कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे महसूल विभागाकडून कोविडच्या आजाराच्या संदर्भात वसतिगृह अधिग्रहित करणार असल्याने

महसूल प्रशासनाचा हा निर्णय फक्त मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनीना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याने ते ताब्यात घेवू नये या आशयाचे निवेदन शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नायब तहसिलदार डॉ. ढोले यांना दिले.

यावेळी सुनील ओहोळ, संतोष शिंदे, वसंतराव नितनवरे, अप्पासाहेब रोकडे, दिलीप भिसे, भारत दिवटे हे उपस्थित होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहात ७५ व मुलींच्या वसतिगृहामध्ये १०० विद्यार्थ्यांची सोय केलेली आहे.

हे सर्व विद्यार्थी मागासवर्गीय असून ग्रामीण भागातील आहेत. जर येथे पुन्हा कोविड सेंटर उभारले तर वसतिगृह बंद करावे लागले तर ते प्रवेशित विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आहे त्या ठिकाणाहून त्यांना इतरत्र स्थलांतरित करणे योग्य होणार नाही.

त्यामुळे संपूर्ण पालकवर्गामध्ये आपल्या मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ते भयभीत झालेले आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाचा हा निर्णय फक्त मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनीना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह येथे राहत असणाऱ्या

विद्यार्थी विद्यार्थिनीना इतरत्र स्थलांतरित करू नये किंवा कोविड सेंटरसाठी प्रशासनाने ताब्यात घेवू नये या मागणीसाठी पालक, विद्यार्थी यांना सोबत घेऊन समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीने दि. ०४/०३/२०२१ रोजी तहसिल कार्यालय श्रीगोंदा येथे संविधानिक मार्गाने उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपस्थितांनी दिली.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24