अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- केंद्रामधील नरेंद्र मोदी सरकारच्या काही योजना आहेत ज्यात लाभार्थीला थेट त्याच्या बँक खात्यात पैसे दिले जातात.
पंतप्रधान मातृ वंदना योजनाचा देखील या अशाच योजनांमध्ये समावेश आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत लाभार्थी गर्भवती महिलेला वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये 5 हजार रुपये दिले जातात.
ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) योजना आहे. 01-01-2017 पासून ही योजना लागू केली गेली आहे. या योजनेंतर्गत त्या गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना तीन हप्त्यांमध्ये पाच हजार रुपयांचा रोख लाभ मिळतो,
ज्यांनी प्रसूती, प्रसूती तपासणी, नोंदणीकृत बाळंतपण आणि कुटुंबातील प्रथम मुलाची प्राथमिक नोंदणी केली आहे त्यांना याचा लाभ मिळतो. या योजनेचा फायदा देहसत कुठेही घेतला जाऊ शकतो.
जे लोक केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात नियमितपणे काम करतात किंवा ज्यांना यापूर्वी कोणत्याही कायद्यानुसार समान लाभ मिळत आहेत त्यांना हा फायदा होणार नाही.
सरकारच्या म्हणण्यानुसार, 2018-19 या वर्षापासून 29 जानेवारी पर्यंत एकूण 1.83 कोटी गर्भवती महिलांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत (पीएमएमव्हीवाय) लाभ मिळवला आहे.