अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्टिट करत आषाढी वारी बाबत मत व्यक्त केले आहे की, कमी उपस्थितीत पायी वारी करणे शक्य होते.
सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पारंपारीक आषाढी वारी पायी होवू शकली नाही. त्यामुळे यंदाही ही परंपरा खंडीत होवू नये यासाठी मानाच्या दहा पालख्या त्या त्या गावांहून वाहनाने पंढरपूरला नेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
मात्र पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून वाखरी ते पंढरपूर पोलीस बंदोबस्तात पायी वारी होणार आहे.याबाबत माध्यमांसमोर बोलताना फडणवीस म्हणाले की, कमी उपस्थितीची पायी वारी करता येणे हे शक्य होते. थोडा सरकारने जर विचार केला असता.
तर निश्चितपणे, कारण त्यांची जी मागणी होती की, केवळ ५० लोकांची परवानगी दिली जावी. यासोबत त्यांनी मार्गावरील सगळ्या गावांचे ठराव घेतले आहेत, की गावातून कुणीही रस्त्यावर येणार नाही.
त्यामुळे इतके शिस्तीत जर काम होते. तर त्यांचा गंभीरतेने विचार सरकारने करायला हवा होता.” असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.