अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- साई मंदिर उघडण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे परिसराच्या अर्थकारणाला आधार मिळेल. भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी तसेच पंचक्रोशीच्या विकासासाठी संस्थानच्या नियमांत राहून सर्वांशी समन्वय ठेवून काम करू अशी ग्वाही साईसंस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

साईबाबा संस्थानच्या २० व्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष म्हणून आमदार आशुतोष काळे यांनी शुक्रवारी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी सीईओ भाग्यश्री बाणायत यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व विश्वस्तांचे संस्थानच्या वतीने स्वागत केले.

यावेळी डॉ. एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, जयंतराव जाधव, अनुराधा आदिक, ॲड. सुहास आहेर, महेंद्र शेळके, अविनाश दंडवते, सचिन गुजर व नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर या नवनिर्वाचित विश्वस्तांची उपस्थिती होती यावेळी बोलताना काळे म्हणाले कि,

साईमंदिर खुले करण्यासाठी शासनाला विनंती करू, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षित व आनंददायी दर्शनासाठी प्रयत्न करू.

भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी तसेच पंचक्रोशीच्या विकासासाठी संस्थानच्या नियमांत राहून सर्वांशी समन्वय ठेवून काम करू, असेही काळे म्हणाले.