ग्रामीण भागात वाढती रुग्ण संख्या चिंताजनक – बाळासाहेब थोरात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :-लक्षणे असलेल्या व्यक्तीला स्वतंत्र ठेवा. कोरोना साखळी तोडण्यासाठी निर्बंधांचे कडक पालन करा.

प्रत्येक गावात तरुणांनी पुढाकार घेत ग्राम आरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम करत लॉकडाऊनचे निर्बंध कडक पद्धतीने राबवा, असे आवाहन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

बोटा व चंदनापुरी कोविड सेंटरची पाहणी करत रुग्णांशी संवाद साधला. चंदनापुरी, आंबी दुमाला, बोटा येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करत शनिवारी मंत्री थोरात यांनी रुग्णांशी संवाद साधला.

आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, आर. बी. रहाणे, विजय राहणे, तुळशीनाथ भोर, सुहास आहेर,

सुहास वाळुंज, बाळासाहेब ढोले, विकास शेळके, संतोष शेळके यावेळी उपस्थित होते. मंत्री थोरात म्हणाले, एका व्यक्तीमुळे कुटुंब बाधित होते.

अशा व्यक्तीचे विलगीकरण करा. यासाठी युवकांनी पुढाकार घेत अनुशासित समित्या तयार करा. घुलेवाडीचे मॉडेल म्हणून अनुकरण करा. या कठीण परिस्थितीत डॉक्टर, अंगणवाडी-आरोग्य-आशा सेविका ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, शिक्षक चांगले काम करत आहे.

त्यांना तपासणीसाठी सहकार्य करा. येथील प्रशासन व यशोधन कार्यालय सेवेसाठी २४ तास कार्यरत आहे. ग्रामीण भागात वाढती रुग्ण संख्या चिंताजनक आहे. वाढ पूर्ण थांबवायची आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24