file photo

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोना शून्यावर आला असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

याबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर प्रश्नी त्यांनी प्रशासकीय स्तरावर काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कोरोनाच्या सद्यस्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी प्रशासनाला काही सूचना केल्या. सध्या जिल्ह्यात १५ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. त्या दहा हजारांनी वाढवून रोज २५ हजार चाचण्या कराव्यात.

लसीकरणाचा वेग वाढवून दिवाळीपर्यंत शंभर टक्के लसीकरण करावे आणि दहापेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या शंभर गावांमध्ये लॉकडाऊन करण्याचा आदेश गमे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

या गोष्टींची काळजी घ्या
कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे तेथे नागरिकांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध घालणे
दहा टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या परिसरात लॉकडाऊन करणे
आठवडे बाजार बंद ठेवणे
मास्क न घालणाऱ्या ग्राहकांना सामान देणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करणे
मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे
होम आयसोलेशन बंद करणे
बंद कोविड सेंटर पुन्हा सुरु करणे, तसेच लसीकरण वाढविणे