कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाने साईनगरीत शिर्डीकरांवर आले मोठे संकट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर पसरू लागली आहे. यातच हजाराच्या घरात गेलेली कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता प्रशासन देखील खडबडून जागी झाले आहे.

यातच उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. यातच साईनगरीतून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. साईबाबांच्या शिर्डी मध्ये सध्या मंदिर रिकामे व कोविड रूग्णालय हाऊसफुल अशी स्थिती आहे.

त्यातच प्रशासनाने पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध न करताच गृह विलगीकरण सुविधा बंद केल्याने रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

संस्थानने तातडीने दोन्ही नॉनकोवीड रूग्णालयांपैकी एक रूग्णालय बंद करून किंवा तातडीच्या सेवा वगळता अन्य सेवा बंद ठेवून तेथील स्टाफ कोवीड रूग्णालयाला पाठवणे, औषधे, मास्क, हॅन्डग्लोज,

पीपीई कीटसह अन्य उपकरणे खरेदीसाठी संस्थानला टेंडरची अडचण असते. प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत भाविकांना आवाहन करून या वस्तु थेट मिळवणे, नर्सिंग कॉलेजमधील ट्रेनी नर्सेसची सेवा घेणे आदी उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे.

कोविड सेंटरला औषधे व स्टाफचा भयंकर तुटवडा आहे. ऑक्सिजनची मागणी वाढली असून यासाठी संगमनेहून रोज वाहतुक सुरू आहे. आरोग्य विभागाकडून पुरेसे डॉक्टर्स व औषधे उपलब्ध होवू शकलेली नाही.

त्यातच प्रशासनाने गृह विलगीकरणाची सुविधा बंद केली आहे. शिर्डी व तालुक्यात रोज सरासरी सव्वाशे ते दिडशे अधिकृत रूग्ण आढळत आहेत.

डॉ़ प्रितम वडगावे, वैद्यकीय संचालक, साईसंस्थान रूग्णालय-कोवीड सेंटरला सामान्य व मध्यम लक्षणे असणाºया रूग्णांसाठी २२० खाटा आहेत.

अत्यवस्थ रूग्णांसाठी पन्नास आयसीयु बेडची सुविधा होती, आता ती पासष्ट करण्यात आली आहे. येथे केवळ तीन व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. बेडची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24