ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीचा कामचुकारपणा ठरतोय ग्रामस्थ- व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar News :- स्वच्छ व सुंदर शहर या मोठमोठ्या मोहिमा राबवण्यात येत असून परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी जनजागृती देखील करण्यात येत असली तर दुसरीकडे पुणतांब्यात याच्या अगदी विरोधी चित्र सध्या दिसून येत आहे.

पुणतांबा येथील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या स्टेशन रोडवर दुर्गंधीमुळे येथील व्यापारी, ग्रामस्थ व विद्यार्थी वर्ग चांगलाच त्रस्त झालेला आहे.

पुणतांबा येथील स्टेशन रोडवर एसटी बसचा थांबा आहे. बस शेडच्या पाठीमागे सार्वजनिक मुतारी तसेच कचरा टाकण्याची जागा आहे. मात्र ग्रामपंचायतीच्यावतीने येथे नियमितणे स्वच्छता करत नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होऊन त्याचा लगतचे व्यापारी तसेच बसची वाट पाहणारे प्रवाशी यांना त्रास होतो.

सार्वजनिक मुतारीच्या दक्षिण बाजूला शाळेची इमारत असून या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्याला त्रास होतो. तसेच या मुतारीची अवस्था फारच वाईट झालेली आहे.

आतील उभ्या फरशा फुटलेल्या आहेत. सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था खूपच खराब झाली आहे. पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे दुर्गंधीत वाढ होते.

संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणजवळ असलेल्या काही व्यापार्‍यांनीच आम्हाला खूप त्रास होतो आम्ही व्यवसाय करावा की नाही ग्रामपंचायत प्रशासन वेळीच दखल घेत नाही. प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office