अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती करोना संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.
करोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ते आवश्यक आदेश वेळोवेळी जारी केले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी घटना व्यवस्थापक तथा तहसीलदार यांची आहे.
त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणांच्या माध्यमातून ती कार्यवाही करावी, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटरची उभारणी, तेथील व्यवस्था, औषधांची उपलब्धता याबाबत दक्षता घ्यावी.
यापुढे रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी लक्षणे असणार्या अथवा त्रास जाणवणार्या व्यक्तींनी तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वताची चाचणी करुन घेतली पाहिजे.
तसेच यापुढे जिल्ह्यात बाधित आलेल्या कोणत्याही रुग्णाला होम आयसोलेशन परवानगी दिली जाणार नाही. त्यांना सक्तीने कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचे तंतोतंत पालन केले जावे. विनाकारण फिरणार्या तसेच विनामास्क फिरुन इतरांच्या आरोग्यास अपाय करण्यास कारणीभूत ठरणार्यांवर कडक कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.