जिल्ह्यातील ‘हे’ धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  जून महिन्यात पावसानं दडी मारल्यानंतर जुलै महिन्यात अखेर पावसाने राज्यात जोरदार आगमन केले. सर्वदूर पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच नगर जिल्ह्यातही गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली असल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

यातच भावली धरण पाणीसाठा 96.50 टक्के होता लवकरच हे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे भावली शनिवारी सकाळी 96.50 टक्के भरले होते. शनिवारी सकाळी मागील 24 तासात या धरणात 73 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासात 50 मिमी पावसाची नोंद झाली होती. 1434 दलघफू क्षमतेच्या या धरणात शनिवारी सकाळी 1384 दलघफू पाणीसाठा होता. घाटमाथ्यावरील वाहुन येणार्‍या पाण्यामुळे या धरणाचा साठा 100 टक्के होवू शकतो.

त्यामुळे या धरणाच्या सांडव्यावरुन भावली ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. हे ओव्हरफ्लोचे पाणी पुढे दारणा धरणात येवु शकेल. तसेच दारणा घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला असला तरी छोटे मोठे धबधबे सुरुच आहे.

दारणा 78 टक्क्यांवर तर गंगापूर 58.57 टक्क्यांवर स्थिर आहे. तर भावली धरण 96.50 टक्के होते. गेल्या 24 तासात 73 दलघफू नवीन पाणी दारणात दाखल झाले. 7149 क्षमतेच्या या धरणात 5572 दलघफू पाणीसाठा झाला आहे.

हे धरण 77.94 टक्के भरले आहे. या धरणात 5.5 टिएमसी पाणी साठा आहे. 1 जून पासून यातील 4.5 टिएमसी नवीन पाणी दाखल झाले. दारणाच्या पाणलोटात मुसळधार पावसाची गरज आहे.

अहमदनगर लाईव्ह 24