सिनेमांचे शूटिंग झालेला ‘तो’ बगिचा समस्यांच्या विळख्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या भितींच्या पायथ्याशी असणा-या बगिच्याची अत्यंत दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. समस्यांच्या विळख्यात सापडलेला या बगिच्याकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे .

अकोले तालुक्यातील पश्चिमेला तालुक्यापासुन ४९ कि मी .वर १९१६ साली ब्रिटीशांनी भंडारदरा धरणाची निर्मिती केली .त्याच वेळी भंडारदरा धरणाच्या बगिच्याची निर्मिती देखील झाली .

राजकपुरसारखा प्रसिद्ध सिनेकलाकारही या बगिच्याच्या प्रेमात पडल्याने ब-याच चित्रपटांचे चित्रीकरणही या बगिच्यात केले गेले . परंतु याच बगिच्याचे आता विद्रुपीकरण झाले असुन याला केवळ भंडारदरा धरणाचे जलसंपंदा विभागाचे उदासिन धोरण कारणीभुत ठरले आहे .

बगिच्यामध्ये पर्यटकांना बसण्यासाठी बनविलेले कठडे ठिकठिकाणी तुटले आहेत तर काही जमिनदोस्त झाले आहेत . बगिच्यात रोज होणारी स्वच्छता थांबल्याने जागोजागी कच-यांचा खच तयार झाला आहे .तर घाणीचे साम्राज्य पसरल्याने सर्वत्र दुर्ग॔धी सुटली आहे .

काही वर्षापूर्वी या बगिच्यात एक तलाव बांधण्यात आला होता .हा तलाव कायम कोरडाठाक असतो .तलावात तलावापेक्षा जास्त उंचीचे गवत वाढले आहे .

भंडारदरा धरणाच्या या बगिच्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बगिचामध्ये असणारा नयनरम्य ” अंब्रेला धबधबा ” हा धबधबा दुरुस्तीच्या नावाखाली जलसंपदा विभागाच्या भंडारदरा धरण शाखेने कायम बंद ठेवणेच पसंत केले. भंडारदरा धरणाच्या बगिच्याला भले मोठे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे .

मात्र हे प्रवेशद्वार कायम कुलुपबंद अवस्थेत असल्याने पर्यटकांना आडबाजुने कसातरी प्रवेश करुन बगिच्यामध्ये जाण्याची वेळ आली आहे .

या बगिच्याची ओळख पुसु नये यासाठी काळजी घ्यावी व पुन्हा पुर्वीचे वैभव करुन द्यावे ही इच्छा स्थानिक नागरीक जलसंपदा विभागाकडे व्यक्त करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office