आरोग्यमंत्री म्हणाले…1 मे पासून मोफत लसीकरण सुरु करता येणार नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे.

यातच राज्यात मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत होते. याच अनुषंगाने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे .

देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे. मात्र, महाराष्ट्रात लसींच्या तुडवड्यामुळे १ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण सुरु होणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सरकारी दवाखान्यात लस मोफत मिळेल. पण खासगी दवाखान्यात तुम्हाला लस विकत घ्यावी लागेल. मोफत लसीकरणासाठी २ कोटी डोसेस विकत घ्यावे लागतील. त्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च येईल.

या खर्चाला राज्य शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती टोपे यांनी दिली. सहा महिन्यात लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यात लसीकरण करायचं म्हटलं तर १२ कोटी डोस द्यावे लागतील.

म्हणजे दर महिन्याला २ कोटी डोस द्यावे लागणार आहेत. आमच्या आरोग्य विभागाच्या १३ हजार संस्था असून त्यांच्या माध्यमाधून दिवसाला १३ लाख डोस देण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

‘कोविन’वर नोंद तरच लस मिळणार ;- लसीकरणासाठी कोविन Appवरून अपॉईंटमेंट घेणं सक्तीचं आहे. त्याशिवाय लस मिळणार नाही.

उठून कोणीही लसीकरणासाठी येईल असं होणार नाही. त्यासाठी कोविन Appवर तुम्हाला नोंदणी करावीच लागेल.

केंद्र सरकारचे तसे आदेशच आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर कुणीही गर्दी करू नये, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24