जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण आढळले ‘ह्या’ तालुक्यात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- नेवासे तालुक्यात कोरोना बाधितांचा दहा हजाराचा आकडा पार होत असताना मंगळवारी नेवासे तालुक्यात जिल्ह्यात सर्वात जास्त २९६ बाधित रुग्ण सापडले.

तालुक्यातील १३१ पैकी १३ गावांमध्ये बाधितांची संख्या पंधरा दिवसांपासून शून्यावर असून तालुक्यातील तब्बल ९१ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले.

मध्यंतरी तपासणी किट नसल्याने नसल्याने तपासणी ठप्प होती. मात्र आता तपासणी किट तालुक्यात उपलब्ध झाल्या. त्यामुळे आता नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज किमान शंभर रॅपिड टेस्ट होत आहेत.

स्वॅबही घेतले जातात. दरम्यान, नेवासे बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रांताधिकारी गणेश पाटील व जिल्हा प्रभारी सहायक आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांच्या नियोजनामुळे गावोगाव तपासणी कॅम्प होत आहेत.

९ मेपासून नेवासे बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सतरा गावांपैकी ज्या गावांमध्ये जास्त रुग्ण संख्या संशयित होती. त्या ठिकाणी कॅम्प घेतले जात आहेत.

या मुळे बाधित यांची संख्या पुढे येत आहे. डॉ. सोमनाथ यादव, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. योगेश मिसाळ, आरोग्यसेवक प्रकाश पाठक व योगेश भोटकर यांनी या कॅम्पचे आयोजन केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24