पैशासाठी रुग्णालयाने मृतदेह अडविला ! अहमदनगर जिल्ह्यातील ही बातमी वाचून तुम्हालाही येईल रडू..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यातच जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलकडून रुग्णांची लूट सुरु आहे.

यातच माणुसकीला काळिमा फासणारी घटना जिल्ह्यात घडली असल्याने अशा खासगी रुग्णालयांमुळे नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन होत आहे.एकीकडे कोरोनाबाधितांसाठी सामाजिक सांगताना दानशूर मदतीसाठी पुढे सरसावत आहे.

तर दुसरीकडे खासगी रुग्णालयाने माणुसकीला सोडून रुग्णांनसह रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करत आहे. चक्क एका रुग्णालयाने बिलासाठी कोरोनाबाधिताचा अडवून धरला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील एका खासगी रुग्णालयात पाथर्डी तालुक्‍यातील शेतकरी असलेला एक कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी नगरमध्ये दाखल झाले.

हॉस्पिटल प्रशासनाने, दोन लाख आठ हजार रुपये भरल्यानंतरच मृतदेह हॉस्पिटलबाहेर सोडू, असे सांगितले. जवळ तेवढे पैसे नसल्याने मृत कोरोनाबाधिताच्या पत्नीने गळ्यातील मंगळसूत्र व अन्य दागिने सोनाराकडे मोडण्यासाठी नातेवाइकांकडे दिले.

त्यातून एक लाख 70 हजार रुपये मिळाले. ते हॉस्पिटलमध्ये देण्यात आले. तरीही हॉस्पिटल प्रशासनाने उर्वरित 38 हजार रुपये भरल्याशिवाय मृतदेह देणार नसल्याचा पवित्रा घेतला. ही रक्कम जमवण्यासाठी मृताची पत्नी काल दिवसभर गावात व विविध नातेवाइकांकडे फिरत होती.

एकीकडे कोरोना योद्धा म्हणून फिरणारे डॉक्टर या कोरोनाचे आर्थिक भांडवल करून स्वतःच्या तिजोर्या भरू लागले आहे. आणि प्रशासन देखील यांच्यावर काहीच कारवाई करायला तयार नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24