हॉटेल मॅनेजरचे घर फोडले ; दीड लाखाचा ऐवज लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-खिडकीचे लोखंडी ग्रील कशाने तरी वाकवून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.

याबाबत संदीप मोहन दानवे (वय २६ वर्षे, हॉटेल मॅनेजर खांडगाव, हल्ली रा.तिसगाव ता.पाथर्डी) यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर असे की, संदीप दानवे हे एका हॉटेलवर मॅनेजर म्हणून काम पाहतात.

हल्ली ते तिसगाव येथे राहतात. दि.२८ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे लाखंडी ग्रील कशाने तरी वाकवून घरात प्रवेश केला.

त्यानंतर घरातील साहित्याची उचकापाचक करून आतील सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम असा एकूण १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबत संदीप मोहन दानवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास पोना.बडे हे करत आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24