अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री रात्री 8.00 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला,
अहमदनगर बद्दल मुख्यमंत्री म्हणाले
पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड या जिल्ह्यांमध्ये आजही काळजी घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे.
महापूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत :- पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पॅकेजची घोषणा करणार नाही पण सगळ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आजदेखील अनेक पालकमंत्री आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी हजर आहेत. आम्ही साडे अकरा हजार कोटींचा निधी जाहीर केला. तात्काळ मदत आणि लॉंगटर्म योजना करत आहोत
कोरोनाची ही टांगती तलवार उधळून लावू:- ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिन म्हटल्यानंतर एक इतिहास वाचत असताना त्यावेळच्या पिढीने कसं झोकून देऊन संघर्ष केलं, त्या काळच्या फक्त आठवणी काढून उपयोग नाही.
आपल्याला कोरोना संकट जाईल असं वाटलं होतं. कमी-जास्त प्रमाणात लाटा धडकत आहेत. किती लाटा येतील याचा अजूनही अंदाज नाही. म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या आठ दिवस आधीच मी आपल्याला नम्र विनंती करतो.
तो संघर्ष फक्त आठवायचा नाही तर आपणही आता निश्चय केला पाहिजे की, प्रतिज्ञा घेतली पाहिजे. जसं आपण दीडशे वर्षांचं राज्य उधळून लावलं. तसंच कोरोनाची ही टांगती तलवार उधळून लावू, ती उलथून टाकूच.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे :