गोठ्यातून एक लाखाच्या गाई चोरल्या शहराजवळील ‘या’ गावातील घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या सुमारे एक लाख रूपये किमतीच्या दोन जर्सी गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.

ही घटना नगर तालुक्यातील नेप्ती या ठिकाणी शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत शेखर दत्तू महांडुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, नगर शहरापासून जवळच असलेल्या नेप्ती गावच्या शिवारात असलेल्या महांडूळे वस्तीवर शेखर दत्तू महांडूळे यांचा गायींचा गोठा असून,

शेखर महांडूळे यांचे बंधू रामदास हे शुक्रवारी (दि.२६) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या गायींना चारा टाकून घरात झोपण्यास गेले त्यानंतर शनिवारी (दि.२७) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा गायींना चारा टाकण्यासाठी गोठ्याकडे गेले असता गोठ्यातील तीन गायींपैकी दोन गायी तेथे त्यांना दिसल्या नाहीत.

याबाबत त्यांनी कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर महांडूळे कुटुंबियांनी परिसरात गायींचा शोध घेतला परंतु त्या मिळून आल्या नाहीत.

ही बाब त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी पाहणी करुन सदर घटना नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे त्यांनी महांडूळे कुटुंबियांस सांगितले.

महांडूळे हे दिव्यांग असल्याने त्यांना नगर तालुका पोलिस ठाण्यात जाणे अडचणीचे होते, त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी त्यांची फिर्याद घेऊन ती नगर तालुका पोलिसांकडे पाठविली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24