अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-एकीकडे कोरोना संकट सुरू असताना चोरट्यांनी गाया लक्ष्य केल्याने नागरिक दहशतीखाली आहेत.
मात्र, गाया चोरण्यासाठी इनोव्हा चारचाकी वाहनांतून शुक्रवारी (ता.१६) मध्यरात्रीनंतर आलेल्या चोरट्यांचा कोपरगाव येथील दुल्हनबाई वस्ती येथील तरुणांनी पाठलाग केला; परंतु पळून जाण्यात ते यशस्वी झाले आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, एक इनोवा आणि वॅगनर कारमधून गाया चोरी करण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ७ ते ८ चोरटे आले असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ परिसरातील तरुणांना संपर्क करून माहिती दिली.
त्यानंतर तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेत पाठलाग सुरू केला. तसेच दगडफेक करून रोखण्याचाही आटोकाट प्रयत्न केला. परंतु अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यास ते यशस्वी झाले आणि पाच गायी तावडीतून वाचल्या.
वाचविन्यात अम्हाला यश आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता त्यांनीही लगेच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला, मात्र फोन न उचलल्यामुळे त्यांना थेट घरी जाऊन घेऊन आले.
त्यानंतर इंजेक्शन दिल्यानंतर गायांची भूल काही वेळानंतर उतरली. दरम्यान, शहरात चारचाकी वाहनांतून गाया चोरी करणारे रॅकेट सक्रिय झाल्याने पोलिसांनी लवकरात लवकर त्यांचा मुसक्या आवळाव्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी केली आहे.