अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- साईबाबा संस्थानने सर्व कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोविडची मोफत लस द्यावी अशी मागणी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल्फफेअर संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक प्रतापराव कोते, अध्यक्ष अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संस्थानमध्ये कायम, कंत्राटी, आउटसोर्स कर्मचारी वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहेत.
आज जगामध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. संस्थानमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा वेळोवेळी भक्तांशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपर्क येत असतो.
त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या महाराष्ट्र शासनामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यात आलेली आहे.
संस्थानचे हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना संस्थानमार्फत कोविड लस विनामुल्य देण्यात आलेली आहे.
त्याच प्रमाणे सर्व कायम, कंत्राटी, आउटसोर्स केलेल्य कर्मचाऱ्यांना संस्थानमार्फत विनामुल्य कोविड लस देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.