अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे चार लाखांची मदत दिली जाणार असल्याचा एक संदेश सोशल मीडियावर फिरत होता.
मात्र अशी कोणतीही योजना नसल्याचे व तो मेसेज फेक असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे. नेमके काय आहे प्रकरण? जाणून घेऊ सविस्तर…
कोरोनामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत केली जाणार असल्याचे संदेश गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत.
‘केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यासाठी मदतीचा अर्ज, न्यायालयाचा निकाल आणि मंत्रालयाचे पत्रदेखील सोबत जोडले आहे.’
हा संदेश पाहून अनेकांनी शासकीय कार्यालये, रुग्णालयांमध्ये चौकशी सुरू केली आहे. मात्र अशी कोणतीही योजना नसल्याचे आढळून आले.
प्रशासनाचे स्पष्टीकरण…
समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या संदेशाला नागरिकांनी बळी पडू नये. यासाठी नागरिकांनी आपला वेळ वाया घालवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.