अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- शहरासह जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल असलेली कर्डिले टोळी १५ महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती दिली.
टोळीप्रमुख सागर विठोबा कर्डिले (३४), सचिन उर्फ लखन मंजाबापू वारूळे (२८) व गणेश गोरख साठे (२९, सर्व रा. वारूळवाडी, ता. नगर) अशी या आरोपींची नावे आहेत.
जिल्ह्यात संघटितपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे, लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करणे,
जिवे मारण्याची धमकी देणे, रस्ता अडवून मारहाण करणे, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करणे असे गंभीर गुन्हे या आरोपींविरोधात दाखल आहेत.
२० नोव्हेंबर २०२० रोजी कॅम्प पोलिसांनी या टोळीला हद्दपार करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. भिंगार कॅम्प पोलिस ठाणे हद्दीतील
तसेच शहर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी तसेच टोळीची सर्वसामान्य नागरिकांमध्ये असलेली दहशत कमी करण्यासाठी,
टोळीच्या गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळीप्रमुख सागर कर्डिले, सचिन वारूळे आणि गणेश साठे यांना महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार कारवाई करून १५ महिन्यांकरिता जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश पारित केला आहे.