‘त्या’ दारूच्या दुकानावरील मेहेरबानी अधिकाऱ्यांना महागात पडणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील वादग्रस्त देशी दारू दुकान चालकाने भूमिअभिलेख खात्याचा बनावट दाखला राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना देऊन परवाना घेतला.

याबाबत तक्रारी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांकडे करूनही या अधिकार्‍यांनी या बनावट दाखल्याची साधी चौकशीही केली नाही. यामुळे या अधिकार्‍याच्या छुप्या सहकार्यामुळेच हे देशी दारू दुकान सुरू आहे.

कासारादुमाला ग्रामपंचायतच आता राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी या दुकानाची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे करणार आहे.

त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क व भूमी अभिलेख खात्याचे अधिकारी यांची लपवाछपवी उघड होणार आहे. दरम्यान या दुकानाबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत.

या दुकानाची जागा बदलताना दुकान मालकाने उत्पादन शुल्क अधिकार्‍यांकडे खोटे कागदपत्र सादर केले होते. एका जागरूक नागरिकाने भुमिअभिलेख खात्याकडे याबाबत चौकशी केली असता या कार्यालयातून असा कोणत्याही प्रकारचा दाखला देण्यात आला

नाही असे पत्र भुमी अभिलेख कार्यालयाकडून या नागरिकास देण्यात आले. दरम्यान बनावट दाखला देऊन दारू दुकानासाठी परवाना घेतल्याचे माहिती असतानाही राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकार्‍यांनी संबंधित देशी दारू दुकानाच्या मालकावर अद्याप कारवाई केलेली नाही.

यामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. या अधिकार्‍यांनी खोटा दाखला दिल्याप्रकरणी देशी दारू दुकानाच्या मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. या देशी दारू दुकानाबाबत तक्रारी वाढल्याने आता ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24