कोविड सेंटरने गरिबांची लूट थांबवावी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोना महामारीने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. श्रीरामपूर तालुक्यात वैद्यकीय सेवेच्या नावाखाली भरपूर कोविड सेंटर चालू झाले आहेत.

मात्र त्यांच्याकडून गोर-गरीबांकडून अवाच्या सव्वा पैसे उकळले जात आहेत. हे प्रकार थांबले नाही, तर आंदोलनाचा इशारा भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिला आहे.

याबाबत पत्रकात मगर यांनी म्हटले, की लॉकडाऊनमुळे लोकांना काम नाही. बेरोजगारी वाढली आहे. त्यात हॉस्पिटल महागडी औषधे, ऑक्सिजन सांगत असल्यामुळे लोक सोने गहाण ठेवून, कोणी व्याजाने पैसे घेऊन पूर्तता करण्याचे काम करत आहेत.

एवढे करूनसुद्धा पैसे संपल्यावर कोविड सेंटरचालक रुग्ण दुसरीकडे हलवण्याचे सांगत आहेत. पैशांअभावी दुसरीकडे ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे रुग्ण दगावतात.

त्यासाठी कोविड सेंटरचालकांनी महाराष्ट्र शासनाने जारी केलेले दरपत्रक कोविड सेंटरच्या बाहेर लावावे, जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना दिसले पाहिजे. ते लावल्याने गोर गरिबांची लूट होणार नाही.

कोविड सेंटरचालकांकडून लूट झाल्यास आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने कोविड सेंटरसमोर कोविड सेंटरच्या चालकांवर कायदेशीर कारवाई व्हावी, या मागणीसाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू, असा इशारा मगर यांनी दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24