थकीत वेतन मागितल्याचा राग आल्याने मजुराला बेदम मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- थकलेला पगार मागीतला म्हणून तिघांजणांनी महादेव वगारहंडे या मजूरास लोखंडी राॅड व लाथा बूक्क्यांनी जबरदस्त मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे.

याबाबत राहुरी पोलिसांत तिघांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, महादेव विठ्ठल वगारहांडे (वय २७ वर्षे रा. बोर्डाता, वणी. जि. यवतमाळ.

हल्ली रा. क्रांती हॉटेलजवळ राहुरी फॅक्टरी). हा तरूण गेल्या ७ ते ८ वर्षांपासून देवळाली प्रवरा येथील आरोपींकडे मजूरीचे काम करत होता. मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आरोपी हे त्याला पगार देत नव्हते.

दोन दिवसांपूर्वीच त्याने आरोपींकडे आपल्या पगाराचे पैसे मागीतले. याचा राग आल्याने आरोपींनी हॉटेल क्रांती जवळ दि. ३१ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास लोखंडी राॅड मारून गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे.

जखमी झालेला महादेव विठ्ठल वगारहांडे याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी 1) देविचंद कुटे 2) संतोष अशोक नालकर 3) गिरीष (पुर्व नाव माहीत नाही) सर्व रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24