अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना कमी घडलेल्या दिसून आल्या होत्या. मात्र नुकतेच त्याने आपल्या हयातीचा पुरावा सिद्ध केला आहे.
नुकतेच आरडगांव येथे एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. यात कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान मनुष्य वस्तीवर येत बिबट्याकडून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरडगाव परिसरत झुगे वस्ती व भांड वस्ती या परिसरात मोठ्या प्रमाणात शेळीपालन व कुक्कुटपालन केले जाते.
येथील चंद्रशेखर मच्छिंद्र गुडघे या शेतकर्याच्या घरी घरगुती चार शेळ्या आहेत. या शेळ्यांच्या आशेने आलेल्या बिबट्याची कुत्र्याला चाहुल लागताच त्याने भुकणे सुरू केले. बिबट्याने कुत्र्याला गवतात ओढून नेले. शेतकर्यांनी आरडाओरडा सुरू केला.
हे बघून परिसरातील शेतकरी जागे झाले. फटाके वाजवित टेंभे पेटविल्याने बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. यामधे कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. संबंधित वनविभागाने तातडीने दखल घेत पिंजरा लावण्याची मागणी येथील शेतकरी वर्गामधून केली आहे.