अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- देवळाली प्रवरा येथिल आंबी रस्त्या लगत सतिष पांडुरंग होले यांच्या वस्तीवर बिबट्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडून गटार आमवस्या साजरी केली आहे.
देवळाली प्रवरा येथिल होले वस्तीवर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन बिबट्यांनी शेळ्यांच्या गोठ्यात शिरुन तीन शेळ्यांचा फडशा पाडला. या भागात बिबट्याचा संचार वाढला आहे.वन विभागाकडे यापुर्वीच पिंजरा लावण्याची मागणी केली परंतू वन विभागाने पिंजरा लावला नाही. उ
पस्थित शेतकऱ्यांनी या भागात मादी व बछडे अशा तीन चार टोळ्या आहेत. यावेळी सतिष होले यांनी सांगितले की, या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे.
रविवारी पहाटे तीन वाजता शेळ्यांच्या गोठ्यात शेळ्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने घराबाहेर येवून पाहिले असता दोन बिबट्यांनी तीन शेळ्यांचा फडशा पाडला होता. वन विभागाने या भागात पिंजरा लावावा अशी मागणी होले यांच्या वतीने करण्यात आली. वनविभागाचे एस.एस.चव्हाण, एम.एच पठाण यांनी भेट देवून पंचनामा केला.