अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-एका शेतकर्याच्या कोरड्या विहिरीमध्ये बिबट्या पडला त्या बिबट्याला वन अधिकारी व कर्मचार्यांनी सुखरूप बाहेर काढले. दरम्यान हि घटना पारनेर तालुक्यातील किन्ही येथे घडली होती.
याबाबत अधिक माहिती अशी कि, किन्ही येथील सोन आंबी परिसरामध्ये धोंडीभाऊ खोडदे यांची विहीर असून सकाळी विहिरी जवळून जात असताना बिबट्याचा आवाज संपत खोडदे व किरण खोडदे यांना आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर बिबट्या विहिरीत पडल्याचे त्यांना दिसला.
त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती शेतकरी नेते अनिल देठे यांना कळवली .त्यानंतर देठे यांनी पारनेरच्या वनक्षेत्रपाल सीमा गोरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना याबाबतची माहिती कळवली. त्यानंतर वन विभागाचे पथक तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. प्रचंड मेहनतीनंतर अखेर संध्याकाळी सातच्या सुमारास बिबट्या पिंजर्यामध्ये गेला.
त्यानंतर त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मागील शुक्रवारी याच विहिरीच्या परिसरामध्ये शेतकर्यांनी बिबट्या पाहिला होता कदाचित त्या दिवशी हा बिबट्या त्या विहिरीमध्ये पडला असेल.
अशी शक्यता तेथील शेतकर्यांनी वर्तवली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून किन्ही बहिरोबावाडी, करंदी या परिसरामध्ये बिबट्या सतत आढळून येत होता शेतकर्यांना यामुळे आपला जीव मुठीत धरून शेतीची कामे करावी लागत होती.