बिबट्या मृतावस्थेत आढळून आला ! झाला होता ‘हा’ आजार…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :-अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी शिवारातील एका शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या पीकात बुधवारी (१८ ऑगस्ट) सुमारे तीन वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

निमोनिया आजाराने या बिबट्याचे प्राण घेतले. कारण या बिबट्याचा मृत्यू हा निमोनिया आजाराने झाल्याचे समोर आले आहे. अकोल्यातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालानुसार या बिबट्याचा मृत्यू निमोनिया आजाराने झाला असल्याची माहीती अकोले वनपरिक्षेत्रच्या वनक्षेत्रपाल भाग्यश्री पोले यांनी दिली आहे.

तालुक्यातील धामणगाव आवारी परिसरातील गणेश दादाभाऊ आवारी हे आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी आले. त्यांना जवळच्याच संतू गणपत सावंत यांच्या सोयाबीनचे पीक असलेल्या शेतात बिबट्या दिसला. ही माहिती धामणगाव आवारीचे उपसरपंच गणेश पापळ यांंना दिली.

जवळ जाऊन पाहिले तर बिबट्या मृत आढळला. उपसरपंच पापळ यांनी वनरक्षक ज्ञानेश्वर कोरडे यांना कळवले. कोरडे आणि वनपाल व्ही. एन. पारधी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृत बिबट्या सुमारे तीन वर्षे वयाचा नर आहे, अशी माहिती वनविभागाच्या कर्मचार्यांनी दिली.

े पंचनामा करून रात्री उशीरा बिबट्याचे पार्थिव श्वविच्छेदनास सुगाव बुद्रूक येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत आणले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केले. बिबट्या निमोनियाने दगावल्याचे वनक्षेत्रपाल बी. एम. पोले यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24