स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्यातील सराईत आरोपी केला गजाआड

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नेवासा तालुक्यातील चांदा येथे दरोडा टाकून अमानुषपणे खून करणारा व मोक्का गुन्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरी अशा चार गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

बाबाखान शिवाजी भोसले (वय ४५, रा. गोंडेगांव, ता. नेवासा, जि. अहमदनगर )असे पकडण्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,गंगाधर व बापू रात्री जेवण करुन घराबाहेर झोपलेले होतो.

यावेळी अज्ञातांनी वस्तीवर येऊन जबर दुखापत केली. ओंकार गंगाधर कर्डीले यास मानेवर, जबड्याजवळ सु-याने जबर दुखापत करुन जिवे ठार मारले.

चुलती अर्चना कर्डीले हिचे गळ्यातील १५ हजार रु. कि. चे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून घेऊन गेले होते, या नवनाथ ज्ञानदेव कडीले ( रा. लोहारवाडी रोड, कर्डीलेवस्ती, चांदा, ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दरम्यान पोलीस निरीक्षक कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी बाबाखान शिवाजी भोसले हा कुळधरण रोड (ता. कर्जत) येथे विटभट्टीवर काम करत आहे.

अशी खात्रीशिर माहिती मिळाली. कटके यांनी पथकाला तशा सूचना दिल्या. पथकाने तात्काळ कुळधरण (ता. कर्जत) येथे जाऊन आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती घेऊन आरोपी भोसले याला ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन पोलिस खाक्या दाखविताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

Ahmednagarlive24 Office