हार्वेस्टरचालकांवर दडपशाही करत स्थानिकांकडूनच बळीराजाची लूट सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- मजुरांअभावी अनेक शेतीची कामे करण्यासाठी यंत्रांची मदत घेतली जात आहे. यातच अनेक आथिर्क संकटांवर मात करत बळीराजाने मोठ्या शिताफीने पिके जपली वाढवली व आता पिके काढणीसाठी आली असता, त्याच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

राहुरी तालुक्यात गहू सोंगणीचा हंगाम जवळ येत असतानाच तालुक्यात हार्वेस्टरचालकांची धावपळ सगळीकडे दिसून येत आहे. मात्र, बाहेरून येणार्‍या हार्वेस्टर चालकांना स्थानिक हार्वेस्टरचे मालक दडपशाही करून पिटाळून लावताना येथील शेतकर्‍यांकडून गहू मळणीचे मनमानी पैसे घेत आहेत.

बाहेरील हार्वेस्टर चालकांना पळवून लावणार्‍या स्थानिक हार्वेस्टरचालकांच्या मनमानीला प्रशासनाने चाप लावावा, शेतकर्‍यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी राहुरीचे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे यांनी केली आहे.

याबाबत बाहेरील हार्वेस्टर चालकांना संरक्षण देण्यासाठी आपण स्वतः तत्पर राहू, अशी ग्वाहीही त्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत कोणत्याही हार्वेस्टरचालकाला दमबाजी व इतर मार्गाने दडपशाही करण्याचा प्रयत्न झाल्यास आपल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ताराचंद तनपुरे यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24