अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- टाकळीभान येथे वाढत्या करोनाच्या रुग्णसंख्येमुळे हे गाव करोनाचा हॉटस्पॉट होण्याची भिती व्यक्त केली जात होती.
ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत योग्य वेळी खबरदारी घेत सोमवार ते बुधवार तीन दिवसाचा कडकडीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता.
या तीन दिवसाच्या कालावधीत करोनाचा फैलाव रोखला गेल्याचे रुग्णसंख्येवरुन दिसून येत आहे. लॉकडाऊन घेण्यापुर्वी उपचार घेत असलेल्या व होमक्वारंटाईन रुग्णांनी शंभरी पार केली होती.
मात्र लॉकडाऊन घेतला गेल्याने कोरोनाची साखळी तुटून पाच दिवसात केवळ 11 रुग्ण चाचणीत सापडले.
लॉकडाऊनचा सकारात्मक परीणाम दिसून आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच व्यवसाय सुरु ठेवण्याचे आदेश काढले आहे.
व्यापार्यांनी करोना चाचणी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व व्यवसाय नियोजित वेळेतच शासकिय नियमांचे पालन करुन सुरु ठेवावेत.
नियम मोडणार्यांवर 5 हजार रुपये दंडाची तरतुद ग्रामपंचायतीच्या नियमावलीत करण्यात आली आहे.