अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- एका छोट्या मुलीला एका युवकाकडून धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून एका गटाने हातात तलवारी तसेच लाकडी दांड्यांचा वापर करीत दहशत निर्माण केली.
हा धक्कादायक प्रकार कोल्हार बुद्रुक येथील अंबिकानगर वसाहतीमध्ये घडला आहे. यासंदर्भात परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, स्नेहल विनायक वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, अमोल शंकर बर्डे याचा एका छोट्या मुलीला धक्का लागल्यावरून वाद झाला होता.
तो समझोत्याने मिटला. मात्र याच वादाचा राग मनात धरून काल गुरुवार दि. 23 रोजी सकाळी येथील जब्बार एजाज खान, अफरोज असलम शेख, सलमान चांद खान, आबिद जमशेद सय्यद, शाहरुख चाँद शेख यांनी हातात तलवारी व लाकडी दांडे घेऊन घरासमोर येऊन शिवीगाळ करत धमकावले.
या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात वरील पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर सुलताना अस्लम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझी 12 वर्षीय नात घरासमोर खेळत असताना अमोल शंकर बर्डे याने दारूच्या नशेत तिला धक्का दिल्याने ती रोडवर पडली.
नीट चालता येत नाही का ? असे म्हणून मी निघून गेले. त्यानंतर रात्री 11 वाजता अमोल बर्डेचा भाऊ कार्तिक शंकर बर्डे हा दारू पिऊन घरासमोर हातात कुर्हाड घेऊन आला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर दुसऱ्या दिवशी अमोल शंकर बर्डे, कार्तिक शंकर बर्डे,
विशाल भाऊसाहेब बर्डे, मुकुंद शिवाजी गांगुर्डे व इतर एक जण असे हातात लाठ्या – काठ्या, कुर्हाडी घेऊन घरासमोर आले. व आमच्या घरावर दगडफेक करू लागले. या फिर्यादीवरून वरील पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.