अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-गेल्या काही महिन्यापासून जनमानसात महावितरण विभागाच्या कारभाराबाबाबत नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.
अवाजवी वीजबिले, सक्तीची वसुली, वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम यामुळे नागरिकांमधील संतापाची भावना उसळली आहे. आता याचा उद्रेक देखील होऊ लागला आहे. याचाच एक प्रत्यय कर्जत तालुक्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आला आहे.
कर्जत तालुक्यातील तळवडी, बारडगाव व येसवडी या तीन गावांच्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा गेल्या सहा महिन्यांपासून कमी दाबाने होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी राशीन वीज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
बळीराजाचा संतप्त भावना पाहता येत्या तीन दिवसांत विद्युत पुरवठा पूर्ण दाबाने सुरळीत होईल, असे लेखी आश्वासन महावितरण विभागाच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, रोज तीन ते चार तास वीज सुरू असते.
त्यामध्येही सतत अर्ध्या, एक तासाला वीज बंद केली जाते. त्यामुळे पूर्ण दाबाने व क्षमतेने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. त्यात आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ठराविक शेतकरीच विहिरीवर व शेतळ्यावर अवलंबून असतात.
त्यांनाही पाणी असून, विजेअभावी पिकांना पाणी देणे अशक्य होते. पिके जळण्याची भीती आहे. त्यामुळे या भागातील सर्व शेतकरी राशीन येथील वीज वितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.