ताज्या बातम्या

Pathaan Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर अजूनही पठाणची जादू कायम! केला 900 कोटींचा आकडा पार, भारतातच कमावले इतके कोटी

Published by
Ahmednagarlive24 Office

Pathaan Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट पठाण बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात विक्रमी कमाई करण्यात ‘पठाण’ ने नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. सुरुवातीला हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता परंतु, नंतर त्याने चांगली कमाई केली आहे.

विशेष म्हणजे ‘पठाण‘ हा हिंदी सिनेसृष्टीतील दुसरा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने तिसऱ्या शुक्रवारी 900 कोटींचा आकडा पार केला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे.

‘पठाण’ने 17 व्या दिवशीही चांगली कमाई केली

बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम आणि सलमान खान यांची भूमिका असणाऱ्या ‘पठाण’ या चित्रपटाने 17 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अजूनही त्यांची कमाई भारतासह जगभर सुरू आहे. कमाईचा विचार केला तर या चित्रपटाच्या निव्वळ हिंदी कलेक्शनने 450 कोटींचा आकडा पार केला असून त्याची जगभरातील कमाई 900 कोटींच्या पुढे गेली आहे.

इतकेच नाही तर बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की हा चित्रपट लाइफटाइम कलेक्शनमध्ये 1000 कोटी पार तर त्याचे नेट इंडिया कलेक्शन 500 कोटी पार करू शकते. 10 फेब्रुवारी म्हणजेच चित्रपटाच्या तिसऱ्या शुक्रवारची आकडेवारी जाहीर केली असून, त्यानुसार पठाणने काल 7 कोटींची कमाई केली आहे. देशातील त्याचे निव्वळ हिंदी कलेक्शन 449.5 कोटींवर गेले आहे, तर दक्षिणेकडील 16.65 कोटींच्या कलेक्शनसह, 466.15 कोटींचा आकडा या चित्रपटाने पार केला आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची हिट रोमँटिक जोडी

दरम्यान या अहवालात असे म्हटले आहे की, आतापर्यंत या चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 562 कोटींच्यावर तर परदेशातील कलेक्शन 345 कोटींवर पोहोचले आहे. जगभरातील एकूण कलेक्शन 907 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ मध्ये पहिल्यांदा दिसणारी शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची हिट रोमँटिक जोडी पुन्हा एकदा आपल्याला या चित्रपटात दिसली आहे.

त्यानंतर या दोन्ही सुपरस्टार्सनी ‘हॅपी न्यू इयर’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ सारख्या चित्रपटांसह अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पठाणमधील शाहरुखच्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर यात त्याने एक्स-रॉ एजंटची भूमिका साकारली असून जी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने चित्रपटात अॅक्शन आणि ड्रामाचा पूर्ण डोस दिला असून हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे.

पठाणच्या आसपास एकही मोठा चित्रपट नाही.

या चित्रपटाच्या कलेक्शनमागील एक कारण हे देखील मानले जात आहे की पठाणच्या आसपास एकही मोठा बॉलीवूड चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झालेला नाही. येत्या 17 फेब्रुवारीला कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. कार्तिकचा 2022 मध्ये आलेला भूल भुलैया-2 हा चित्रपट बॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

जर या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आर्यनसोबत क्रिती सेनन या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोबतच मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय, राजपाल यादव यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात काम करणार आहेत. कार्तिकच्या आगामी चित्रपटातील ‘कॅरेक्टर धीला-2’ हे गाणे यापूर्वीच सुपरहिट झाले आहे. याबाबत कार्तिकने ट्विटमध्ये सांगितले आहे, त्याच्या चित्रपटाचे हे गाणे 24 तासांत सर्वाधिक पाहिलेला व्हिडिओ बनला आहे.

Ahmednagarlive24 Office