महाराष्ट्र सरकारने अटकेची हीच तत्परता प्रलंबित गुन्ह्यांसाठी दाखवावी.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे तीव्र पडसाद नगर शहरातही उमटले आहे. भारतीय जनता पार्टीच्या मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे यांच्या नेतृत्वाखाली एसटी स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

यावेळी तीघाडी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. जनता कोरोनाच्या आगीत होरपळत असताना त्यातून जनतेला बाहेर काढण्याच्या ऐवजी महाराष्ट्र सरकार आपली ताकद व प्रशासनाचा वेळ फालतू गोष्टींसाठी खर्च करण्यात गुंतली आहे.

महाराष्ट्रातील अनेक नागरिक आपल्या न्याय हक्कासाठी पोलीस स्टेशनचे व कोर्टाचे उंबरे वर्षानुवर्षे झिजवत आहेत, परंतु त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. राज्यामध्ये खून, दरोडे, बलात्कार, महिलांवरील अत्याचाराचे अनेक गुन्हे प्रलंबित आहेत.त्यातील काही गुन्ह्यांचा तपासात अजीबात प्रगती नाही.

अनेक आरोपी मोकाट फिरत आहेत. परंतु या गुन्ह्यांचा तपास लावण्याऐवजी महाराष्ट्र सरकार शुल्लक गोष्टीसाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकून त्यांना हवे तसे वागवून घेत आहेत.राज्यातील पोलीस प्रशासन सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत.

शर्जील उस्मानी महाराष्ट्रात येतो भारत मातेला शिव्या देतो त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस महाराष्ट्र सरकारमध्ये नाही. नारायण राणे यांचे वक्तव्य चुकीचे आहे. परंतु नारायण राणे यांना ज्या पद्धतीने त्रास द्यायचे काम राज्यातील सत्ताधारी पक्ष करीत आहेत.असे चितळे म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24