लवकरच महाविकास आघाडी सरकारचेही विसर्जन व्हावे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही ही आमची नव्हे तर जनतेच्या मनातील इच्छा आहे, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी जळगावात राज्य सरकारवर केली.

राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन व्हावे, हे सरकार पायउतार व्हावे, असे आमच्यापेक्षा जनतेलाच वाटतं आहे. राज्यातील जनता त्रस्त झाल्याचे आज आपण सर्वजण बघत आहोत. ज

नतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी असे सर्वांचेच प्रश्न कायम आहेत. महाविकास आघाडी सरकारला सर्वच घटक कंटाळले आहेत.

आज जी वेळ राज्यावर आली आहे, ती कधीही आलेली नव्हती. अतिशय दुर्दैवी वेळ या सरकारने आणली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Ahmednagarlive24 Office