अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- मुंबईतल्या साकीनाका निर्भया प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. साकीनाका प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे परप्रांतीयांची नोंद ठेवा, असे थेट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. ‘राज्यात बाहेरुन कोण येतो?
कुठून येतो? कुठे जातो?’ याची नोंद ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. राज्यातील महिला अत्याचारांवर बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत हे आदेश दिलेत. रविवारपासून सुरू झालेले उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सोमवारीही सुरू होते.
राज्यात बाहेरुन कोण येतो? कुठून येतो, कुठे जातो, याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. पोलीस महासंचालक कार्यालयात काल गृहविभागाची आढावा बैठकीत झाली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत.