बाजार समितीचे ‘ते’ गेट पुन्हा चर्चेत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-  गेल्या तीन वर्षापासून बाजार समितीचे बंद असलेले मुख्य गेट तात्काळ उघडण्यात यावे यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

आता पुन्हा एकदा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निश्चित झाल्याप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे बंद असलेले प्रवेश द्वार खुले करण्याचे पत्र दि.१८/०२/२०२१ रोजी बाजार समिती सचिवांना दिले होते. मात्र तरीही यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

बाजार समितीने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. परिणामी अनेक व्यापाऱ्यांना शेतकयांना तसेच नागरिकांना मोठा त्रास होत आहे, अशी तक्रार शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडीच वर्षापासून बंद असलेले गेट शिवसेनेने आंदोलन करून कुलूप तोडून खुले केले होते. हे गेट उघडण्याबाबत जिल्हाधिकारी यांचा कोणताही आदेश नसल्याचे स्पष्ट करत बाजार समितीने या घटनेची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविली आहे.

यामुळे हे नगर बाजार समितीचे काही दिवसांपूर्वी उघडलेले गेट पुन्हा शहर वाहतूक शाखेने बंद केले आहे. गेट बंद असल्याने व्यापार्यांच्या व्यवसायावर गेल्या काही वर्षापासून परिणाम झालेला आहे व आताही परिणाम होत आहे. त्यात कोव्हीड- १९ च्या कठीण काळात व्यापारी, शेतकरी जगला पाहिले.

कृषि उत्पन्न बाजार समिती हे प्रवेशद्वार उघडण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ करत आहे. व त्यांची मानसिकताही दोन ते तीन वर्षापासून प्रवेशद्वार उघडण्याची दिसून येत नाही.

येथील व्यापारी वर्गाने हाईट बॅरीकेट बसवण्यासाठी तयारीही दर्शविली आहे. त्यामुळे आपण सदर प्रवेशद्वार खुले करण्याचे आदेश जारी करावेत अशी मागणी प्रा.गाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24